कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने उड्डाणपूलावरील खड्डे स्वखर्चाने बुजविले
पनवेल दि.17 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिकेचेकार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांनीतत्परतेने पनवेलकडून नवीन पनवेल कडे जोडणाऱ्या उड्डाणपूलावरील खड्डे स्वखर्चाने बुजविल्याने त्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल बाजूकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर पावसाच्या तडाख्यामुळे खड्डे पडले होते. यासंदर्भात अनेकांनी सिडकोशी संपर्क साधून खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित नागरी प्रश्न राजू सोनी यांच्या लक्षात येतात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ आपले कामगार व इतर यंत्रणा पाठवून पडलेले खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. याबद्दलत्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.