स्वातंत्र्य काळापासून दुर्लक्षित असलेल्या माथेरान डोंगरपट्टीतील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या माझ्या आदिवासी वाड्यापाड्यांत डांबरी रस्त्याची मूलभूत पण कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्या.आदि.कविता वसंत निरगुडे(आदिवासी समाजसेविका) यांची मागणी.
वार्ताहर/: माथेरान डोंगरपट्टीतील सागाचीवाडी व त्या शेजारील बोरीचीवाडी,भूतीवली, चिंचवाडी,धनगरवाडा,धामनदांडा नाण्याचामाल,आसलवाडी,या आदिवासी बहुलवाड्या स्वातंत्र्यकाळाच्या काही दशकानंतरही मूलभूत सुविधांपासून कायमस्वरूपी वंचित आहेत.या आमच्या आदिवासी वाड्यांमध्ये डांबरी रस्ता सोडा साधा खडी मातीचा कच्चा रस्ताही झाला नाही;याचे आश्चर्य वाटते.सदर रस्ता व्हावा यासंदर्भात जिल्ह्याधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय,कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय,आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई कार्यालय,या सर्व कार्यालयांना लेखी निवेदने देऊन झाली.काहींना प्रत्येक्ष भेटून पायऱ्या झिजवून झाल्या.चातकासारखी डांबरी रस्त्याच्या कामाची वाट पाहून झाली,परंतु सदर डांबरी रस्त्याच्या प्रलंबित प्रस्तावित कामाची प्रत्येक्ष सुरुवात झाली नाही.शासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करून सदर प्रलंबित प्रकरणाचा मागोवा घेतल्यानंतर शासनाकडून कळते की सदर रस्ता किरवली ते किरवली ठाकूरवाडी,सागाचीवाडी,बोरीचीवाडी,भुतवलीवाडी,चिंचवाडी,धामणदांडा,नाण्याचामाळ,आसलवाडी,धनगरवाडा,जुमापट्टी,हा रस्ता,रस्ते विकास आराखडा सन २००१-२१ नुसार ग्रामीण मार्ग क्र.१४८असून त्याची एकूण लांबी १३.५ कि.मी.आहे.सदर रस्ता हा डोंगर पायथ्यावरून दुर्गम भागातून खाजगी जमीन व वन जमिनीतून जातो.तसेच सदर रस्ता करणेसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला आहे.व आम्हाला कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था,रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे सांगितले आहे.त्यानुसार अनेक पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून आमच्या आदिवासींच्या भावनांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता सदर प्रस्तावित रस्त्याचे काम प्रत्येक्ष सुरू झाले नसल्यामुळे,आमच्या आदिवासी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
ब्रिटिश काळापासून दुर्लक्षित खितपत पडलेल्या आमच्या आदिवासी वाड्यांना डांबरी रस्ता अद्याप पाहण्यास मिळण्यात किती विलंब लागणार आहे असा प्रश्न पडू लागला आहे.आमच्या वाड्यांमध्ये सवर्ण समाजाच्या लोकांचे वास्तव्य असते,तर सदर रस्त्याचे काम स्वातंत्र्य काळाच्या काही वर्षातच झाला असता. प्रलंबित रस्त्याचे काम वेळीच न होण्याचे कारण जातीवाद समजायचा का?
करलो दुनिया मुठ्ठी मे ! सध्या जग म्हणे एका क्लिकवर पोहचले आहे.परंतु आमच्या आदिवासी वाड्या डोंगरावरच!त्या कधी मुख्य प्रवाहात यायच्या?आमच्या आदिवासी डोंगरपट्टीतील आदिवासींना,डोंगराखालील गावाकडे यावे लागते.जंगलातील विविध वस्तू गोळा करून त्या डोंगराखालील गावाकडे विक्रीसाठी घेऊन जाव्या लागतात.रात्री अपरात्री जीवघेण्या पायवाटेने भिवपुरी रेल्वे स्टेशनपर्यन्त पहाटेच्या अंधारी रात्री गडद काळोखात जीवघेण्या पायवाटेने पायी प्रवास करावा लागतो.पावसाळ्यात तर निसटत्या पायवाटा होतात.तसेच पाण्याने भरलेले ओढे जीवावर उदार होऊन पार करावे लागतात.तसेच पावसाळ्यात गवत वाढल्यामुळे पायवाट ही शोधत चालावे लागते.
उंच डोंगरमाथ्यावर एखादे मंदिर,मस्जिद वैगरे असले तरी तेथे डांबरी किंवा काँक्रीटचे रस्ते बांधले जातात.मग माणसांत देव पाहणाऱ्या आपल्या प्रशासकीय यंत्रणेने आमच्या आदिवासी वाड्यापाड्याना डांबरी रस्त्याची सोय करायला नको का?आमच्या आदिवासी वाड्यांत रस्ता नसल्यामुळे रात्री अपरात्री एखाद्याची तब्बेत बिघडल्यास ,चादरीची डोली करुन दोन -चार जनांच्या खांद्यावर व्याधीग्रस्त इसमाला वैद्यकीय उपचार करण्यासाठी शहरी भागात न्यावे लागते.परंतु कैक वेळेस व्याधीग्रस्त इसमाला,उपचारास उशीर झाल्याने रस्त्यातच आपला प्राण गमविण्याची वेळ येते.परंतु अशा प्रकारची घटना आमच्या आदिवासी भागात झाली तर जबाबदार प्रशासकीय विभागाविरोधी उच्च न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेन. एकविसाव्या शतकातही माझ्या आदिवासी बहुल भागामध्ये रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत.त्यामुळे आपल्या स्वतंत्र भारत देशात आम्ही पारतंत्र्यासारखे जीवन कंठीत आहोत.
आमच्या भागामध्ये रस्ता नसल्यामुळ,कोणत्याही परगावची मुलगी आमच्या आदिवासी वाड्यात सून म्हणून येण्यास इच्छुक नाहीत.जीवघेण्या पायवाटेने,रेल्वे स्थानकाजवळील गावात शाळेसाठी दैनंदिन प्रवास करायचा असल्यामुळे आमची आदिवासी मुळे शाळेत जाण्यासाठी नाके मुरडतात.त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे.महाविद्यालयीन तरुणींना तर पायी चालत जावे लागत असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव अर्धवट शिक्षण सोडून आपल्या स्वप्नांची राखरांगोलो करावी लागते.आमचा आदिवासी समाज आता कुठे कात टाकू इच्छितो परंतु प्रगतीसाठी दळणवळणाची आवश्यक असणारी सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे आमचा डांबरी रस्ता न करता आम्हाला मागास ठेवण्याचा प्रशासनाने घाट घातला आहे कि काय?असा प्रश्न भेडसावतो.लोक चंद्रावर,मंगलावर पोहचले परंतु स्वातंत्र्य काळापासून डांबरी रस्ता आमच्या आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये कसा पोहचला नाही?
यापूर्वी माझ्या समाजातील मंडळी अल्पशिक्षित व अशिक्षित होती तेव्हा त्यांना आपल्या मागासलेपणाचे लाज वाटत नव्हती परंतु माझ्यासारख्या काही आदिवासी तरुणी-तरुण यांनी शिक्षण घेतले आहे.त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची जाणीव होऊ लागली आहे.आणि आमच्या मागासलेपणाची लाज वाटू लागली आहे.आमच्या हक्कांसाठी आम्हाला लढण्याचे बल यावे,यासाठी सामाजिक एकता आणि एकात्मता टिकविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.डांबरी रस्त्यासारखी सुविधा आमच्या आदिवासी भागात व्हावी यासाठी माझा आदिवासी समाज पुरता पेटून उठला आहे.मतदानावर बहिष्कार घालू,त्यासाठी उपोषण,मोर्चा,आपले सरकार पोर्टल, पंतप्रधाल पोर्टल,जनता दरबार,लोकशाही दिन,महिला लोकशाही दिन,फेसबुक,ट्यूटर,यु ट्यूब,इन्स्त्राग्राम,फेसबुक पेज,व्हाट्सए,वर्तमानपत्रे,न्यु चॅनल,न्यूज पोर्टल या सोशिअल माध्यमांचाही लाभ घेईन.आमच्या आदिवासी वाड्यामधील मूलभूत सुविधा सुटण्यासाठी मला प्रसंगी आत्मदहणाची वेळ आलि तरी बेहत्तर!
आमच्या डोंगरपट्टी भागामध्ये मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी,प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या परिवाराला घेऊन आमच्या वाड्यांच्या जीवघेण्या वाटेने प्रवास करून बघावा.लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक पावसाळ्यात ठेवून आमच्या आदिवासी भागात आठवडाभर राहून,दैनंदिन प्रवास करून बघावा!तेव्हा तुम्हाला आमच्या दुःखाची किंमत कळेल.आपल्या वातानुकूलित वाहनांतून,महालांतून उसंत असेल तर नक्की एकदा माझ्या आदिवासी डोंगरपट्टील भेट देऊन बघाच!
साहेब प्रलंबित असलेल्या माझ्या माथेरान डोंगरपट्टी आदिवासी भागातील डांबरी रस्त्याचे काम तात्काळ अंतिम मान्यता देऊन प्रत्येक्ष कामाला सुरुवात करावी व दिंनदुबळया आदिवासो समाजाला मुख्य प्रवाहात आणन्यासाठी सहकार्य करावे,अन्यथा आमचा आदिवासी समाजबांधव व विविध आदिवासी संघटना यांना पाठीशी घेवून आपल्या प्रशासकीय कार्यालयांवर निदर्शने केली जातील हे ध्यानी ठेवावे.अशा आशयाचे निवेदन आदि.कविता निरगुडे (आदिवासी समाजसेविका)यांनी मा.तहसिलदार कर्जत यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना दिले.ततप्रसंगी आदि.चेतन बांगारे,बिरसा क्रांतीद(ठाणे जिल्हा अध्यक्ष),प्रकाश शिद,प्रणाली वाघ,एकनाथ वारघडे,विष्णू गोरे,समीर ऐरेकर,अजय जाधव,योगिता गोरे,योगेश निरगुडे,संगीता निरगुडे,बाळू पिरकर,ढोले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.*