कंटेनरच्या धडकेत पादचार्या मृत्यू
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः एका भरधाव कंटेनरच्या धडकेने पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे ते जेएनपीटी महामार्गावर घडली आहे.
या ठिकाणावरुन जाणार्या कंटेनर क्र.एमएच-46-एच-6352 वरील चालक अजय कुमार यादव (33) यानेे त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने, अविचाराने हयगयीने चालवित असताना त्याने भंगारपाडा गावच्या हद्दीत एका पादचारी इसमाला धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सदर कंटेनर घेवून पसार झाला होता. परंतु पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.गणेश दळवी व त्यांच्या पथकाने कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.