मा उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्यातर्फे पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर स्प्रे व बॉटल वाटप
पनवेल / प्रतिनिधी : कोरोनां वैश्विक महामारी च्या काळात आपल्या सर्वांच्या सुरक्षततेची जवाबदारी आपल्या प्राणाची पर्वा न करता पोलीस प्रशासन करत आले आहे.
सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करत आणि पोलीस स्मृतिदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व मा. उपमहापौर श्री विक्रांतदादा पाटील यांच्या वतीने पनवेल शहर व तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर स्प्रे आणि बॉटल वाटप करण्यात आले.कोरोना काळात पोलिसांची विचारपूस करून त्यांच्या स्वास्थ्या काळजी घेतल्या बद्दल पनवेल शहर आणि तालुका पोलिस कर्मचार्यांनी विक्रांतदादा यांचे आभार मानले.
यावेळी श्री.निलेश वाडेकर आणि श्री.रोहन वाजेकर उपस्थित होते.