कर्म योगी बाबा आमटे मोफत आरोग्य सुविधा केंद्र, मुंबई यांच्या शिफारशीनुसार सौ.रुपालीताई शिंदे यांची रायगड जिल्हा / तालुका अध्यक्षा पदी नियुक्ती..
पनवेल वार्ता प्रतिनिधी : शुभांगी पवार सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या, गरीब – गरजू,निराधार लोकांना सतत मदत करणाऱ्या, आपल्या कार्याचा ठसा आख्या पनवेल शहरात उमटवणाऱ्या धडाडीच्या, कर्तव्यदक्ष अश्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांची ख्याती आहे. आज त्यांच्या कार्याची दखल घेत कर्म योगी बाबा आमटे मोफत आरोग्य सुविधा केंद्र, मुंबई यांच्या शिफारशीनुसार अध्यक्ष रायगड जिल्हा / तालुका पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने त्यांना 1) संपुर्ण जिल्ह्य़ात तालुका /गांव पातळीवर कार्यकर्ते ची निवड करायची आहे.
2)स्थानिक पातळीवर पोलीस ठाण्यात येणाऱ्या केसेस घेता येणार आहे.
3)ज्या ठिकाणी पोलीस पिडीत महिला, पुरुष, लहान मुले व मुली यांच्या केसेस कोटुंबिक म्हणून नाकारतात त्या केसेस ना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
4)पिडीत महिला कोणत्याही जाती, धर्म, समाजाची असो आपण त्याना आधार देण्याचे काम अध्यक्षा म्हणून करणार आहेत.
5)फॅमिली कोर्टाने नाकारलेले केसेस घेऊन मोठया न्यायालयात दाखल करण्याचे काम करायचे आहे .
6)असह्य, अज्ञानी लोकांना मदत होईल अश्या स्वरूपाची कामे रायगड जिल्हा / तालुका अध्यक्षा म्हणून कार्य करणार आहेत.
7) समाजातील दृष्टप्रवृत्ती, हुंडाबंदी, महिला अत्याचार (कौटुंबिक हिंसा ), बलात्कार यांच्या विरोधात सजग राहून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सौ. रुपालीताई शिंदे यांचे कार्य अविरत चालू राहील हीच सर्वसामान्यांची मनोकामना आहे.तसेच त्यांच्यावर पुढील यशस्वी वाटचालीसाठी जनमानसातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.