नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांची मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली पुर्तता
पनवेल, दि.28 वार्ताहर) ः नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.18 येथील विविध नागरी समस्या मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तातडीने लक्ष घालून त्याची पुर्तता केली आहे.
प्रभाग क्र 18 मध्ये नवीन पनवेल सेक्टर 3 स्टीलमॅन सोसायटी मधील नागरिकांची स्ट्रीट लाईट, जोड रस्त्यावरील आणि गार्डन मधील वाढलेले गवत याबाबद्दल तक्रारी आल्या होत्या. सिडको आणि महानगरपालिका अधिकार्यांशी बोलून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी काम पूर्ण करून घेतले. याबद्दल प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.