मोटार सायकलची चोरी
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः राहत्या घराच्या दुकानासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना करंजाडेमध्ये घडली आहे.
30 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची सुझुकी मोटार सायकल क्र.एमएच-46-बीएच-7671 ही फिर्यादी अन्वेश जाधव यांनी स्वामी समर्थ कृपा सोसायटी सेक्टर 4 करंजाडे येथे राहत्या घराच्या दुकानासमोर रस्त्यावर उभी करून ठेवलेली गाडी चोरीस गेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.