उपोषणला बसलेल्या प्रकल्पग्रस्ताची श्री.बबन दादा पाटील यांनी घेतली भेट
पनवेल / प्रतिनिधी : शनिवार दिनांक ३१/१०/२०२० रोजी श्री. बबनदादा पाटिल ह्यांच्या बहिणेचे निधन झाले होते. त्यांचे होमकार्य आज सकाळी वाकडी येथे पार पडले. त्यावेळी माननीय जिल्हाप्रमुख व माजी आमदार श्री. मनोहरशेठ ह्यांनी प्रकल्पग्रस्त त्यांच्या मागण्यांसाठी उलवे येथे उपोषणाला बसलेले असल्याचे कळवले.
प्रकल्पग्रस्तांच्या ह्या विषयाची माहिती मिळताच वाकडी येथूनच श्री. बबनदादा पाटील हे तातडीने निघून उलवा येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्यासाठी पोहचले व उपोषणकर्त्याना पाठिंबा दर्शविला. प्रकल्पग्रस्तांच्यासाठी आपले वैयक्तिक दुख: बाजूला ठेउन धावणारा दुसरा नेता आज घडीला नाही.
ह्यावेळी रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील ह्यांच्यासह जिल्हाप्रमुख व माजी आमदार श्री. मनोहरशेठ भोईर, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री. सुदाम पाटील व स्थानिक नेते उपस्थित होते.