बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिला पोलिसांशी मैत्री करुन त्यांची फसवणुक करणार्या तोतया पोलिसाला अटक
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाउंन्ट तयार करुन त्याद्वारे महिला पोलिसांसोबत फेसबुक वरुन मैत्री करुन त्यांच्याकडून रोख रक्कम उकळणा़र्या भामटयाला एका महिला पोलिसानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना उघडकिस आली आहे. मिलींद रमेश देशमुख (28) असे या भामटयाचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याला फसवणुकिसह इतर कलमाखाली अटक केली आहे.
या भामटयाने अनेक महिला पोलिसांकडून व इतर महिलांकडून रोख रक्कम उकळली असल्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्याची कसुन चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मिलींद देशमुख या भामटयाने फेसबुकवर पोलिसाच्या युनिफार्ममधील दुसर्याच व्यक्तीचा फोटो ठेवून पीएसआय गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले होते. त्यानंतर त्याने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून अनेक महिला पोलिसांना व इतर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केली होती. पंधरा दिवसापूर्वी कळंबोलीत रहाणा़र्या व सध्या मुंबई पोलीस दलात असल्याचे उघड झाले. त्यानुसार सदर भामटयावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाला देखील त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. सदर फेसबुकवर पोलीस उप निरीक्षकाच्या युनिफार्म वरील फोटो असल्याने महिला पोलिसाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती. त्यानंतर भामटया मिलींद देशमुख याने या महिला पोलिसाला मसेंजरवरुन संपर्क साधुन त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्या सोबत बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने, तो पोलीस उप निरीक्षक गणेश मोरे असल्याचे व तो ठाणे पोलीस दलात नेमणुकीला असल्याचे तसेच तो ठाण्यातील कोपरीगांव येथे राहत असल्याचे सांगून या महिला पोलिसावर आपली छाप पाडली होती. त्यानंतर सदर भामटयाने महिला पोलिसाला संपर्क साधून, त्याच्या खिशातील पाकीट पडल्यामुळे तो ठाण्यात अडकुन पडल्याचे सांगितले. तसेच त्याला पैशांची गरज असल्याचे सांगून त्याला पैसे पाठवून देण्यास सांगितले. मात्र त्यावेळी पैसे नसल्याने या महिला पोलिसाने त्याला पैसे पाठविले नाही. मात्र, त्यानंतर दुस़र्या दिवशी पुन्हा सदर भामटयाने या महिला पोलिसाला संपर्क साधुन त्याला पैशांची गरज असल्याचे सांगून गुगल पेवरुन दहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यावेळी महिला पोलिसाने त्याच्यावर विेशास ठेवून त्याला गुगल पेवरुन दहा हजार रुपये पाठवून दिले. मात्र, त्यानंतर देखील भामटा मिलिंद देशमुख हा सतत पैसे मागत असल्याने या महिला पोलिसाला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या व या भामटयासोबत संपर्कात असेलल्या इतर महिला पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सुद्धा पीएसआय गणेस मोरे हा त्यांचेशीही फेसबुक व वाट्सऍपवरुन बोलत असल्याचे तसेच त्यांच्याकडे देखील तो वारंवार पैसे मागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गणेश मोरे हा पी.एस.आय असल्याबाबत शंका निर्माण झाल्याने या महिला पोलिसाने त्याला प्रत्यक्ष भेटून खात्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला पोलिसाने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याने कल्याण रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार महिला पोलीस गेल्या असताना, त्या ठिकाणी त्यांना कैलाश शिवराम भांडे नावाचा अनोळखी व्यक्ती भेटला. त्याच्याकडे महिला पोलिसाने अधिक चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेला मोबाईल काढून त्याच्यावर पीएसआय गणेश मोरे या नावाचे फेसबुक खाते दाखविले. तसेच त्यानेच सदरचे फेसबुक खाते तयार केल्याचे व त्याच्यावरुनच तो बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सदर भामटयाने पीएसआय गणेश मोरे या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करुन तसेच पोलीस उप निरीक्षक असलेचे खोटे सांगून त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर या महिला पोलिसाने त्याला पकडून कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याचे नाव कैलाश शिवराम भांडे नसून, त्याचे खरे नाव मिलींद रमेश देशमुख आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. या भामटयावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.