प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एलियनच्या हस्ते खड्यांचे मोजमाप. राजे प्रतिष्ठान पनवेलचा अनोखा उपक्रम
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगर पालिका व सिडको प्रशासन यांच्या ढिसाळ कारभाराने आधीपासून जनता ट्रस्ट आहेत त्यातच पनवेलची जनता खड्डे, रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित असून आजही त्रास सहन करीत आहेत. नुकतेच राजे प्रतिष्ठानमार्फत खड्ड्यांची आरती करण्यात आल्यानंतर प्रश्न जागे होऊन थोडेफार खड्डे बुजविण्यास सुरुवात केली मात्र पनवेल महानगर पालिका हद्दीत पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा आदी परिसर समाविष्ट असून याठिकाणी देखील खड्डे पडलेले दिसून येत आहेत. शहरातील रस्त्यांवर महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठानमार्फत पनवेल महानगर पालिका हद्दीतील पनवेल शहर व नवीन पनवेल येथील खड्ड्यांचे मोजमाप एलियन (दुसऱ्या ग्रहावरचा माणूस) कडून मोजण्यात आले. यावेळी पनवेल व नवीन पनवेल याठिकाणी ४ ते १० फूट लांबीचे खड्डे एलियनच्या हातामध्ये फुटपटटी देऊन मोजण्यात आले व प्रशासनाने याबाबत अधिक जास्त लक्ष देऊन खड्डे कायमचे बुजवावेत व डांबरीकरण वा काँक्रीटीकरण करून घ्यावे अशी मागणी देखील राजे प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे, नारायण कोळी, मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके (मामा) व मुंबई अध्यक्ष प्रकाशभाई कोळी यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा महाडिक यांच्या नेतृत्वाने हे अनोखे आंदोलन आज पार पडले व यानंतरही जर का प्रशासन गांभीर्याने पाहत नसेल तर यानंतरचे आंदोलने हि शांततामय नसतील व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल तसेच फक्त अधिकाऱ्यांना भेटणे व पत्र देणे इतकेच काम राजे प्रतिष्ठान करत नसून जनतेसाठी रस्त्यावर देखिल उतरते त्यामुळे पनवेलमधील जनता राजे प्रतिष्ठानकडे जनतेसाठी भांडणारा भविष्यातील एक भक्कम विरोधक म्हणून पाहत आहे व त्यांच्या विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान या एलियन आंदोलनाची पनवेल तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे दिसून येते. यावेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, नयन भोईर, अशोक चिरके, स्वप्नील बिरारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.