मोबाईल चोरुन पसार होणार्या गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 ने केले गजाआड
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः मॉर्निंग वॉक करीत असताना एका इसमाकडे असलेला मोबाईल फोन दोन अज्ञात चोरट्यांनी खेचून घेवून मोटार सायकलीवरुन पसार झाल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल फोन व मोबाईल हस्तगत केली आहे.
सदर गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे सपोनि कराड, सपोनि गायकवाड, सपोनि ढोले, पो.हवा.साळुंखे, पो.हवा.पवार, पो.हवा.गडगे, पो.हवा.पाटील, पो.ना.कुदळे, पो.ना.कानु आदींचे पथक गुन्हेगाराचा शोध घेत असताना पोलीस नाईक सुनील कुदळे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाद्वारे त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी मन्नान अजीज पटेल रा.तळोजा यास सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील 14 हजार रुपये किंमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल तसेच 50 हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर 220 लाल काळ्या रंगाची मोटार सायकल असा एकूण 64 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.