- शिवसेनेच्या मागणीनंतर गरीब कोरोनाग्रस्तांची लुट करणार्या रुग्णालयाची भरारी पथकाद्वारे होणार उच्चस्तरिय चौकशी
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कोविड-19 (कोरोना) बाधीत सर्वसामान्य गरीब रुग्णांवर मोफत औषधोपचार करणे व पनवेलमधील व रायगड जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष अधिकार्यांची नेमणूक करण्यात यावी, गरीब रुग्णांची लुट करणार्या रुग्णालयाची भरारी पथकाद्वारे उच्चस्तरिय चौकशी करून योग्य ती कारवाई व उपाययोजना करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी शासनाकडे केली होती.
या संदर्भात त्यांच्या मागणीची दखल शासनाने घेतली असून राज्य आरोग्य, हमी सोसायटी, मुंबईचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन) डॉ.संजीव वामन प्रभाकांबळे यांनी या संदर्भात त्यांना पत्र देवून संबंधित मागणीनुसार 20 पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे व निःशुल्क दरात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. याबाबत मा.मुख्य आरोग्य अधिकारी महानगरपालिका, पनवेल यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता किंवा रिर्पींशश्रलेीिेीरींळेपऽसारळश्र.लेा या संकेतस्थळावर आपला अर्ज ईमेल करू शकता किंवा अधिक माहितीसाठी पनवेल जिल्ह्याचे समन्वयक डॉ.वैभव गायकवाड यांच्याशी मो.8275095902 या क्रमांकावर संपर्क साधू शकता, अशी माहिती देण्यात आली आहे.