सिने अभिनेते मिलिंदजी सोमण यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या वतीने पिंकाथॉन-२०२० स्पर्धेचे आयोजन
पनवेल / वार्ताहर : आज दि. ८ नोव्हेंबर २०२० रोजी सिने अभिनेते मिलिंदजी सोमण यांच्या संकल्पनेतून विशेष करून महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली व रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सुद्धा पिंकाथॉन-२०२० चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महिला व छोट्या मुला-मुलींनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेस रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे मा. अध्यक्ष तथा साई देवस्थान,साईनगर, वहाळचे संस्थापक अध्यक्ष श्री. रविंद्र का. पाटील, विदयमान अध्यक्ष श्री. शिरीष कडू, वितेश म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.