कामोठ्यात दिसलेल्या त्या विमानाविषयी सर्वांची उत्सुकता कायम
पनवेल दि.15 (वार्ताहर)- कामोठे वसाहत परिसरात कमी उंचीवरून एक विमान जात असताना काही क्षणांसाठी ते जागीच स्थिरावल्याने त्या विमानाविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.
कळंबोली सर्कलकडून जे.एन.पी.टी. च्या दिशेला कामोठे वसाहतीवरून चाललेले एक विमान काही क्षणांसाठी कमी उंचीवर स्थिरावले होते. त्यामुळे वसाहतीमधील उत्सुकता तसेच भीतीचे वातावरण होते. या घटनेची माहिती तत्काळ पोलिस ठाण्यात सुद्धा कळवली. परंतु या विमानाची उत्सुकता चांगलीच ताणली गेली असून अद्याप यासंदर्भात अधिक माहिती नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.