स्टीलच्या मालाचा अपहार करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः विश्वासाने पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या गाड्यांमध्ये भरुन दिलेला स्टील प्लेटचा तसेच माईल्ड स्टील प्लेटस् अशा वर्णनाचा माल इच्छित स्थळी न पोहोचविता त्या मालाचा अपहार करून स्वतःच्या जवळ बाळगल्याप्रकरणी चौघां जणांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमपाल सैनी यांनी तळोजा औद्योगिक वसाहत येथून रमनजी श्रीरामचंद्र मुखिया (22) धंदा चालक, ओमप्रकाश रामनरेश कहार (28) व रामचरित रसलाल पंडित (38), मोहम्मद तैय्यब शेख (35) यांना वेगवेगळ्या गाड्यांमध्ये भरून दिलेला स्टील प्लेट तसेच माईल्ड स्टील प्लेटस असे 01,21,980 रुपये किंमतीचा माल मुंबई साकीनाका विक्रोळी भोईसर तारापूर आदी ठिकाणी पोहोचविण्यास सांगितले असता या चार आरोपींनी आपसात संनगमत करून सदर ठिकाणी माल न पोहोचविता त्या मालाचा अपहार केला व सदर माल मोहम्मद शेख याने त्याच्या कब्जात बाळगल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि प्रवीण फडतरे करीत आहेत.