गाव तेथे शिवसेना उपक्रमाद्वारे गावागावात शिवसेना फलक उभारण्यात येणार- खा. श्रीरंग बारणे
पनवेल, दि.24 (वार्ताहर)- गाव तेथे शिवसेना हा उपक्रम, हि चळवळ गावागावत पोचावी म्हणून शिवसेनेचे फलक गावाच्या दर्शनी भागात उभारून त्याठिकाणी पक्षनेत्यांचे विचार लिहण्यात येणार, आवश्यक त्या सूचना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये शिवसेनेचे फलक आवर्जून उभारावेत असे आवाहन शिवसेना खा. श्रीरंग बारणे यांनी पनवेल तालुक्यातील वाकडी या गावात उभारण्यात आलेल्या नामफलकाच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी खा. श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, उपतालुकाप्रमुख बबन फडके, नवीन पनवेल शहरप्रमुख रूपेश ठोंबरे, वाकडी शाखाप्रमुख सुकेश भोपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली असून आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा ठाम विश्वास जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यक्त केला आहे. फोटोः वाकडी गाव येथील नामफलकाचे उद्घाटन करताना खा. श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, उपतालुकाप्रमुख बबन फडके, नवीन पनवेल शहरप्रमुख रूपेश ठोंबरे, वाकडी शाखाप्रमुख सुकेश भोपी आदी