राजे प्रतिष्ठान कामगार सेना व संविधान प्रचारक यांच्या वतीने नवीन पनवेल येथे संविधान दिन साजरा.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना आणि संविधान प्रचारक यांच्या वतीने नवीन पनवेल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. तसेच मुंबई मध्ये २६-११ ला झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल शहर अध्यक्ष संतोष आमले, ता. उपाध्यक्ष विजय दुदरेकर, नवीन पनवेल उपाध्यक्ष राजपाल शेगावकर, सचिव सुरेश भोईर, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छिन्द्र पाटील, अमित पंडित, हनुमंत सुरते, कैलास रक्ताटे, अरविंद भगत, योगेश तांबडे, भगवान पाटील, स्वरूप घोडके,ओंकार महाडिक,अशोक चिरके आदी उपस्थित होते.