पारगाव ता आष्टी येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला
वार्ताहर : आष्टी तालुक्यात सध्या बिबट्या चा वावर असून सर्व तालुक्यातील नागरिका मध्ये भीती पसरली आहे, अनेक ठिकाणी बिबट्याने नागरिकांवर हल्ला चढवला आहे, सगळी कडे पिजरे लावले आहे परंतु अद्याप बिबट्याला पकढायला वन विभागाला यश आले नाही, आताचीच ताजी घटना,पारगाव ता आष्टी येथे महिलेवर बिबट्याने हल्लाकरून जखमी केले असून आरडा ओरडा केल्या मुळे बिबट्या तिथून पळून गेला. “देव तारी त्याला कोण मारी”असेच म्हणावं लागेल सदर महिलेला आष्टी ग्रामीण रुग्णायलाय उपचारासाठी दाखल केले आहे सदर परिसरा मध्ये दोन बिबटे आहेत असे घटनास्थळी असणाराचे म्हणणे आहे. श्री.शालन शहाजी भोसले यांच्या पत्नी रानातून गवत घेऊन येत असताना त्याच्यावर हल्ला केला, वनविभागाची टीम परगावात आली परंतु बिबटयाला पकडण्यात अपयशी वनविभाग ठरत असून नागरिकांन मध्ये संतापाची लाट पसरली आहे, बिबटयाला लवकरात लवकर पकडवे अशी मागणी आष्टी तालुक्यातील नागरिक करत आहे.