लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन
नवी मुंबई प्रतिनिधी:लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस यांच्या संयुक्त वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
महामानव, बोधिसत्व, भारतरत्न
प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिन निमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन सिउड एल & टी समोर सेक्टर २८ येथे करण्यात आले होते यावेळी जवळ पास १०० हुन अधिक जणांनी कँन्डल लाऊन आदरांजली देण्यात आली.
तुळसी वाटप व काँडल मार्च आयोजन रविवार रात्री ०८ ते ०९ या दरम्यान आयोजित केले होते
या प्रसंगी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, प्रियंका पांलट हाऊस चे मालक विक्की वांडे, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ नाईक, जयश्री फांऊंडेशन चे अध्यक्ष वैभव जाधव मैत्री ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष अक्षय काळे व इतर मान्यवर व ग्रुपच्या सदस्यनी उपस्थिती दर्शविली.