भूमीपुत्र मासे विक्रेत्यांना शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील मिळवून देणार न्याय
पनवेल, दि.9 (संजय कदम) ः नवीन पनवेल परिसरातील भूमीपुत्र मासे विक्रेत्यांचा प्रश्न जटील होत चालला असून याबाबत शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याने मासे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवीन पनवेल आदई सर्कल येथे स्थानिक व आसपासचे भूमिपुत्र मासळी विकुन आपला चरितार्थ चालवतात. ह्या लोकांना महापालिका फेरीवाला प्रतिबंधक पथकाच्या कारवाई मूळे अतिशय त्रास होत आहे. या स्थानिक मराठी मासळी विक्रेत्यांना विक्री साठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. शिवसेना नवीन पनवेल विभाग प्रमुख किरण सोनवणे यांच्या सुचने प्रमाणे व त्यांच्या नेतृत्वाखाली मासळी विक्रेत्यांनी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची भेट घेऊन आपले प्रश्न व मागण्यांचे लेखी निवेदन दिले. या निवेदनावर बबनदादा पाटील यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून पनवेल महापालिका आयुक्तांशी फोन वर चर्चा केली. व सद्य स्थितीत मासळी विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करु नये व त्यांना महानगर पालिके तर्फे मासळी विक्री साठी हक्काची जागा उपलब्ध होई पर्यंत तात्पुरती आदाई सर्कल येथेच मासळी विक्रीची परवानगी द्यावी व महानगर पालिकेतर्फे होऊ घातलेल्या मार्केट मध्ये हक्काची जागा मिळणेसाठी प्राथमिकता द्यावी अशी लेखी सूचना केली. त्यामुळे या मासळी विक्रेत्यांचे प्रश्न व मागण्यांचे निरसन झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.