मुंबई एक्सप्रेस वेवर डिझेल टँकरला आग
वार्ताहर:-पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात डिझेल टँकरला आज पहाटे सहाच्या सुमरात आग लागली. या आगीत MH.46. AR. 3166 ह्या गाडीची केबीन पूर्णपणे जाळून खाक झाले आहे.
आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस-बोरघाट यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आग देवदूत यंत्रणा व खोपोली अग्निशमन दल यांनी आग विझवली. सदर घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
वाहतूक काही वेळात सुरळीत करण्यात आली आहे.