इच्छेविरूद्ध शारिरिक संबंध ठेवून मारहाण करणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- लग्न केले काय, शारिरिक संबंध ठेवले काय असे सांगून एका महिलेवर तिच्या इच्छेविरूद्ध शारिरिक संबंध ठेवून तिला शिवीगाळी व मारहाण केल्याबद्दल पनवेल तालुका पोलिसांनी एका इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आकाश नारायण सिंग (वय-28 रा.-उत्तन भाईंदर) असे या इसमाचे नाव असून त्याने तक्रारदार हिस पनवेल येथे राहणाऱ्या एका ओळखीच्या ठिकाणी आणून तिच्याकडे शारिरिक संबंधाची मागणी केली असता सदर महिलेने तू माझ्याशी आधी लग्न कर त्यावर आरोपी आकाश सिंग यानेलग्न केले काय, शारिरिक संबंध ठेवले काय असे सांगून त्या महिलेवरतिच्या इच्छेविरूद्ध शारिरिक संबंध ठेवून तिला शिवीगाळी व मारहाण केल्याबद्दल पनवेल तालुका पोलिसांनी एका इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.