पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा अभिनव उपक्रम पनवेल परिसरात थंडीत कुडकूडणाऱ्या निराधारांना ब्लॅंकेटची ऊब
……………………………………
पनवेल(प्रतिनिधी): पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता *सामाजिक उपक्रमांतर्गत* ज्यांची पांघरुण घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, अशा *गरजू नागरिकांना पनवेल बस स्थानक, रेल्वे स्थानक, तक्का परिसरात मायेची ऊब देण्यासाठी पांघरूण वाटप* करण्यात आले.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत, त्यातच आजचा आगळावेगळा उपक्रम म्हणजे मायेची ऊब. या उपक्रमांतर्गत अनेक गरजूंना पांघरुण वाटप करण्यात आले. या स्तृत्य उपक्रमामुळे पनवेलसह रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कौतुक होत आहे.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष केवल महाडिक, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, सहखजिनदार अनिल कुरघोडे, सल्लागार निलेश सोनावणे, जेष्ठ पत्रकार अरविंद पोतदार, मयूर तांबडे, विवेक पाटील, मंदार दोंदे, ओमकार महाडिक, सुभाष वाघपंजे, शेखर भोपी, अॕड. मनोहर सचदेव, सुमेध वाघपंजे, प्रथमेश रेवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.