शिवसेनेचा रायगड जिल्ह्यात झंझावात ; खांदा वसाहतीतील शिवसेना शाखेचे नुतनीकरण आणि उद्घाटन
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात सर्व राज्यभर आहे आणि त्याच्याच एक भाग म्हणून पनवेल जवळील खांदा वसाहतीमधील शहर शाखेच्या नूतनीकरण आणि उद्घाटन श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ विधानसभा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उदघाटन सोहळ्या प्रसंगी उत्तर रायगड संपर्कप्रमुख दत्ता दळवी, रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका सौ. कल्पनाताई पाटील, विधानसभा संघटिका सौ.रेवती सकपाळ, महानगरसंघटिका सौ. शुभांगी शेलार, उपमहानगरसंघटिका सौ. रिना पाटील, खांदा कॉलनी शहरसंघटिका सौ. सानिका मोरे, कामोठे शहरसंघटिका सौ. सुलक्षणा जगदाळे, नवीन पनवेल शहरसंघटिका सौ. अपूर्वा प्रभू, खांदा कॉलनी उपशहरसंघटिका सौ. संचिता राणे, ग्राहककक्ष उपजिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे, युवासेनेचे पराग मोहिते, नितीन पाटील, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.