मराठा तरुणांनी व्यवसायात अग्रेसर व्हावे हा हेतूने मराठा बिझनेस असोसिएशन म्हणजे MBA या संघटनेचा शुभारंभ.
पनवेल/ प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आज दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी मराठा बिझनेस असोसिएशन म्हणजे MBA या संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबई व रायगड जिल्हा परिवाराच्या वतीने पनवेल येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि संघटनेचा लोगो आणि फेसबुक ग्रुपचे अनावरण करण्यात आले. मा. श्री. केवल महाडीक (प्रसिद्ध व्यावसायिक मीडिया) सहसचिव राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला तर प्रसिद्ध व्यावसायिक व मार्गदर्शक विजय चव्हाण (हाॅटेल बाजीराव ) कामोठे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल धुमाळ यांनी केली तर आभार प्रदर्शन सखाराम यांनी केले. या प्रसंगी महीला ऊद्योजिका शिवांजली रेवंडकर, सुप्रिया निकम, मानसीताई भगत, भारती गुंजाळ तसेच देवराम हाडवळे, राकेश मोरे, शिवाजी बेलोटे, विनायक दवंग, बबन खणसे, प्रशांत गायकर, नारायण पाटील, अमोल भोर, श्रीकांत गोडांबे, पत्रकार रवींद्र गायकवाड, ओमकार महाडिक यांच्यासह अनेक व्यावसायिक उपस्थित होते. मराठा तरुणांनी व्यवसायात यावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे. त्याच बरोबर मराठा समाज संपूर्ण भारतामध्ये विखुरलेला आहे तो या व्यवसायिक व्यासपीठावर एकत्र यावा आणि मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायामध्ये येण्यासाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी व्यावसायिक उद्देश केंद्रीत संघटना आज पासून आपल्या बांधवांच्या व्यावसायिक विकासासाठी कार्यरत करण्यात आली आहेत. या प्रसंगी सर्व सदस्य व पनवेल परिसरातील नामवंत व्यावसायिक मराठा बांधव व भगिनी उपस्थित होते. सर्व मराठा तरुणांनी मराठा व्यावसायिकांनी मराठा बिझनेस असोसिएशन या फेसबूक आणि ग्रुप ला सामिल होण्यासाठी आवाहन यावेळी करण्यात आले.