राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने पत्रकार दिनी पनवेलमधील पत्रकारांना करण्यात येणार पत्रकारिता पुरस्कार 2021 ने सन्मानित.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेने मार्फत नेहमीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेतली जाते पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ व समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो तसेच पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचे काम अविरतपणे करीत असतात याची जाणीव ठेवूनच तसेच पत्रकारिता समाज जीवनात बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजवरच्या पत्रकरितेच्या इतिहासात असे अनेक बदल समाजात, व्यवस्थेत घडून आले आहेत. फक्त बातम्या देवून पत्रकारांचे काम संपत नाही तर त्यापलीकडे जावून समाजात बदल, परिवर्तन घडवून आणावं लागतो. या सर्वांची दखल घेऊनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत बुधवार दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित दिव्यांग बौद्धिक मुलांची शाळा प्लॉट नंबर १३७ सेक्टर १, शबरी हॉटेल जवळ नवीन पनवेल याठिकाणी पनवेल तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकारिता पुरस्कार 2021 देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या अध्यक्ष जितेंद्र खानविलकर जितू काका यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लोकनेते माजी खासदार मा.श्री.रामशेठ ठाकूर साहेब ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.माधवराव पाटील, मा.श्री. डॉक्टर गिरीश गुणे, पनवेलच्या महापौर मा.सौ. कविता चौतमोल, भारतीय मानव विकास ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर नंदकुमार जाधव हे लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिका सभागृह नेते मा.श्री.परेश ठाकूर, महापालिका विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रीतम म्हात्रे स्थायी समिती सभापती मा.श्री. संतोष शेट्टी, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख मा.श्री. रामदास शेवाळे, राष्ट्रवादी पनवेल जिल्हाध्यक्ष मा.श्री.सतीश पाटील, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.अतुल चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत.तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख मा.श्री.अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.श्री.नारायण कोळी ,मा.श्री. राजू दादा मरे, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सचिव मंगेश लाड, सहचिटणीस सचिन लोखंडे, ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश महाजन, नवी मुंबई अध्यक्ष डॅनी डिसोझा, महाराष्ट्र महिला अध्यक्षा अर्चना पाटील हे उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस केवल महाडिक यांनी केले आहे.