रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.च्या के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांची बिनविरोध निवड
खारघर दि.३ (प्रतिनिधी)-रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्छ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन पनवेल येथील के.आं.बांठिया महाविद्यालयात संपन्न झाली.या सभेत के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य मा.भगवान शिवदास माळी यांची महासंघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष,प्राचार्य,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी अभिनंदन केले आहे.
रायगड जिल्ह्यात माध्यमिक व उच्छ माध्यमिक महाविद्यालये जवळपास आठशे आहेत.या विद्यालयांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असतात.शासनाशी विचारविनिमय करण्यासाठी कृतिशील असा रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.या मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षांची निवड ही जिल्ह्यातील सर्व विद्यालयांतील मुख्याध्यापकांमधून केली जाते.
जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी मा.भगवान माळी यांची निवड झाल्याबद्धल कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.बाळाराम पाटील,सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.वसंतराव ओसवाल,रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी भाऊसाहेब थोरात,पनवेलचे गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे,शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे सचिव मिलिंद जोशी त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था चालकांनी अभिनंदन केले आहे.