मा.कोकण म्हाडा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिवसाहि’ज मल्टीस्पेसिएलिटी हॉस्पिटल चे उदघाटन.
पनवेल/प्रतिनिधी:करंजाडे येथील नवीन बांधण्यात आलेल्या शिवशाही’ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा लोकार्पण सोहळा श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी बोलतांना करंजाडे मधील नागरिकांना शिवशाही’ज मल्टीस्पेशालिटी च्या मार्फत चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि त्यांनी डॉ वेलहारे यांचे कौतूक केलं की लहान वयात त्यांनी खूप प्रगती केली व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.या वेळी इतर मान्यवर उपस्थित होते.