हुंडाई गाडीसह 2 लाख 89 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू व पानमसाला गुटखा कामोठे पोलिसांनी केला हस्तगत
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखू व पानमसाला गुटखा या अन्न पदार्थाची वाहतूक व विक्रीसाठी प्रतिबंधीत असतानाही बेकायदेशीररित्या मानवी शरिरास घातक व लोकजिवीतास धोका निर्माण करणारे प्रतिबंधीत अन्न पदार्थाची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने हुंडाई गाडी घेवून कामोठे परिसरात फिरत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास 2 लाख 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
कामोठे वसाहत परिसरात अशा प्रकारचा प्रतिबंधीत माल घेवून हुंडाई कंपनीची गाडी क्र.एमएच-43-आर-1889 वरुन काही इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, सहा.पो…