नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाची मागणी
पनवेल, दि.7 (वार्ताहर)ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दिवंगत नेते, लोकप्रिय नेते, शेतकरी कष्टकर्यांसाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ नेते स्वर्गीय दिनकर बाळू पाटील उर्फ दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाला नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी कष्टकर्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणे व त्यांची बाजू विधिमंडळ आणि लोकसभेत मांडणे, कामगारांचा आवाज म्हणून ओळख असणारे दि बा पाटील यांनी कारावास सुध्दा भोगला होता, तसेच त्यांनी पनवेल चे नगराध्यक्ष, पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, रायगडचे दोन वेळा खासदार अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. नवी मुंबई सिडको आणि जे एन पी टी प्रकल्पग्रास्थांसाठी त्यांनी दिलेला लढा विशेष उल्लेखनीय ठरला आहे, त्याचप्रमाणे आगरी, कराडी, कोळी, दलित, मुस्लिम अशा सर्व समाजाची बाजू लोकसभेत व विधिमंडळात मांडली, व फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे, शेतकरण्यासाठी संघर्ष करणारे तसेच आपण जर पाहिलेत तर जो प्रकल्पग्रस्त व्यक्ती जे काही कार, बंगला, दाग दागिने घालून फिरतोय ते फक्त आणि फक्त दि बा साहेबांमुळे जर का त्यांनी साडे बारा टक्के चा मुद्दा मांडला नसता तर प्रकल्प ग्रस्तांचे काय झाले असते कुणास ठाऊक? त्यामुळे त्यांचे या प्रकल्पग्रस्थानवर खुप मोठे उपकार आहेत, जर का हे दि बा साहेबांने केले नसते तर निश्चितच हा समाज त्या गोष्टीपासून वंचित राहिला असता. याचा संघर्ष त्यांनी आयुष्यभर करत राहिले, यामुळे आम्हाला याची खूप जाणीव आहे तसेच जर कोणी यांच्या नावाला विरोध करत असेल या गोष्टीची आम्हाला खूप खंत वाटते, कृपया कोणीही राजकारण न करता त्यांच्या नावाला विरोध करू नये, अशी विनंती करत आहोत. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्या समवेत महाराष्ट्राचे संपुर्ण कार्यकर्ते या मागणीसाठी पाठिंबा देण्यास तयार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली.