पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट च्या “उद्योग श्री” गणेशाची प्राणप्रतिष्ठा संपन्न51 व्या वर्षी नव्या रूपातील गणेशमूर्ती मंदिरामध्ये स्थानापन्न महाप्रसादाने झाली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता
पनवेल/वार्ताहर :पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट आवारात असणाऱ्या गणपती मंदिर स्थापनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. “उद्योग श्री” या नावाने येथील गणपतीबाप्पा ओळखले जातात. रविवार दिनांक 10 जानेवारी रोजी या मंदिरात नव्या रूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दोन दिवसांच्या धार्मिक विधी नंतर महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली.पाषाणात घडवलेल्या सुबक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुले झाले आहे.मंदिर विश्वस्त कमिटीचे तथा पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट चे चेअरमन विजय लोखंडे यांनी या सोहळ्या बाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्च…