विरोधी पक्षनेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत फिरते आरोग्य सेवा केंद्र सुरु
पनवेल/वार्ताहर :पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था व निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिरते आरोग्य सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.ही मोहित रविवारपासून (दि.10) पुढिल दहा दिवस राबविण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्घघाटन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रज्योती ताई म्हात्रे , शेकाप व पदाधिकारी श्री विजय काळे , ॲड. किरण घरत , युवा नेते मंगेश अपराज, श्री योगेश कोटेकर, शिवसेना नेते लिलाधर भोईर, सोसायटी पदाधिकारी व नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
“माझा प्रभाग, परीसर निरोगी व्हावा, वृद्ध, लहान मुले, तरुण यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी छोटासा प्रत्येकाच्या दारापर्यंत मोफत फिरते आरोग्य सेवा केंद…