कामोठे तील स्नेहल निंबाळकर ठरल्या मिसेस परफेक्ट इंडिया
ठाणे येथे संपन्न झालेल्या सौंदर्य स्पर्धेत सुयश
पनवेल /प्रतिनिधी:- ठाणे येथील डोनाल्ड पकेट सभागृहात नुकतीच सौंदर्य स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये कामोठे येथील स्नेहल निंबाळकर यांनी पहिला रनर अप मिसेस परफेक्ट इंडिया 2021 किताब पटकावला. या यशाबद्दल निंबाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकले.
ही स्पर्धा राहुल यादव आणि आसावरी जोशी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये फक्त 12 मिस आणि मिसेस होत्या .यात स्नेहल निबाळकर यांनी पहिल्या 12 मध्ये स्थान मिळवले. मिसेस परफेक्ट इंडियाची अंतिम स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनर रपचा किताब पटकावला . नऊवारी साडी परिधान करून निंबाळकर यांनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर…