सकाळ भवन ते पाम बीच मार्गावरील नो पार्किंग चा ताण लगतच्या रस्त्यांवर बाजूच्या रस्त्यांवर लागत आहेत वाहनांच्या चार चार रांगा आपत्कालीन वाहने जाण्यास होतो अडथळा.
पनवेल/प्रतिनिधी: बेलापूर मधील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा मार्ग म्हणजे सकाळ भवन ते पाम बीच मार्ग.या दरम्यानच्या रस्त्यावर वाहने उभी करण्यास प्रशासनाच्या वतीने मज्जाव करण्यात येत असल्या मुळे या रस्त्यालगतच्या जोडरस्त्यांवर वाहनांच्या चार-चार रांगा लागल्या असल्याचे विदारक दृश्य सध्या बेलापूर मध्ये दिसत आहे.व्यापारी दृष्टिकोनातून पाहिल्यास या पट्ट्यात शो रूम्स,हॉटेल,बार,कॉर्पोरेट ऑफिसेस,फूड जॉईंट,चेन रेस्टॉरंट असल्यामुळे बारमाही वर्दळ असते.येथे येणारे नागरिक गाड्या पार्क करण्यासाठी आजूबाजूच्या जोड रस्त्यांचा आसरा घेत आहेत.
दौशा राम म्हात्रे मर्गासह काही समांतर रस्ते सकाळ भवन ते पाम बीच मधील मार्गाला जोडले गेले…