विक्रीकर माजगाव डॉकयार्ड येथे नोकरीस लावतो असे सांगून फसवणूक करणारा आरोपी गजाआड
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः विक्रीकर माजगाव डॉकयार्ड येथे शिपाई व स्टोअर किपर्स या पदासाठी नोकरीला लावतो असे आमिष दाखवून अनेक जणांकडून जवळपास 1,65,000/- रुपये घेवून त्यांची फसवणूक केल्याबद्दल पनवेल तालुका पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे.
फिर्यादी चंद्रकांत वीर याच्यासह त्याचे नातेवाईक यांना आरोपी वैभव कांबळे (40 रा.कोन गाव) याने तुम्हाला विक्रीकर माजगाव डॉकयार्डमध्ये नोकरीस लावतो असे सांगून त्यांच्याकडून आत्तापर्यंत 1 लाख 65 हजार रुपये रोख रक्कम काढून घेवून त्यांना नोकरीस न लावता त्यांची फसवणूक केल्याबद्दल त्याच्याविरोधात भादवी कलम 420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पगार, सपोनि प्रशांत शिर्के आदींच्या पथकाने सदर आरोपीला अटक केली आहे.