साडेपाच लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थासह वाहने व मोबाईल गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने केले हस्तगत
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः नशामुक्त नवी मुंबई अभियानाच्या अनुषंगाने अंमली पदार्थाविरोधात जोरदार कारवाई सुरू असून गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने नुकत्याच केलेल्या कारवाईत जवळपास साडेपाच लाख रुपये किंमतीचा चरस हा अंमली पदार्थ तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा व दोन मोबाईल हस्तगत केले आहेत.
पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहा.पो.आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वपोनि एन.बी.कोल्हटकर, सहा.पो.नि.निलेश तांबे, गंगाधर देवडे, सहा.पो.उपनिरीक्षक संजय पवार, पो.अंमलदार शशिकांत शेडगे, विष्णू पवार, प्रकाश साळुंखे, सचिन टिके आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना खारघर येथील फ्युचर स्प्रिंग बिल्डींगच्या मागील बाजूस अशा प्रकारचे काही व्यक्ती सदर माल घेवून येणार असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी महेश शर्मा (35) व राहूल साहू यांना त्यांच्याकडे असलेल्या अॅक्टीव्हा गाडी व मोबाईलसह अटक केली आहे. व त्याच्याकडून चरस हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
फोटो ः हस्तगत केलेल्या अंमली पदार्थासह अधिकारी वर्ग.