परदेशात नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
पनवेल दि.२१ (वार्ताहर ) परदेशात नोकरीला लावतो असे सांगत तिचा विश्वास संपादन करून तिची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे.
प्रतिमा दुबे (वय ४२, राहणार -नेरे) यांनी परदेशात नोकरी मिळण्यासाठी वेगवेगळ्या संस्थेमध्ये वैयक्तिक माहिती ऑनलाईन दिलेली होती. त्याप्रमाणे आरोपी सुनील मिश्रा (वय२८) व विशाल कोचार (वय ३२) यांनी तिला फोन करून तुम्हाला परदेशात नोकरी देतो असे सांगून तिचा विश्वास संपादन करून तिला ऑनलाईन बँकिंग द्वारे ६२ हजार १७७ रुपये भरण्यास सांगितले, व ते भरल्यानंतरही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी त्या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.