कोरोना नियंत्रण आणण्यात संपुर्ण जगामध्ये आपला देश अग्रेसर राहणार-आयुक्त सुधाकर देशमुख
पनवेल दि.२८(वार्ताहर) कोरोना नियंत्रण आणण्यात जगामध्ये आपला देश सर्वात पुढे व अग्रसेर राहणार असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज शहरातील लाईफ लाईन हॉस्पीटल येथे चौथ्या लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या वेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह पनवेल महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील, डायरेक्टर पराग बेडसे, डॉ.आनंद गोसावी, चांडक, रेहाना, डॉ.लोहारे, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. केतकी म्हस्के, डॉ. अभिजीत म्हस्के शुभांगी पाटील, रोजी सिंग यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगीतले की, पनवेल महानगर पालिका क्षेत्रात या लसीकरण केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असून, या पुर्वी एमजीएम हॉस्पिटल, डॉ.पोळ हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. व आज पनवेल शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल येथे चौथे केंद्र सुरु केले जात आहे. साधारण पाच ते साडेपाच हजार कोरोना योध्यांना ही लस देयाची असून, सध्या ही लस आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येत आहे राज्य शासनाच्या पुढील आदेशानुसार ही लस पालीका हद्दीतील रहिवाश्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आत्ता पर्यत्त हजार कोरोना योद्धांना लस देऊन झाली आहे. १० फेबु्रवारी पर्यत्त पहिला टप्पा पुर्ण करायचा आहे. तरी सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. तर या वेळी बोलताना डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगीतले की, सर्वांनी कोरोना संदर्भात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी पाळाव्यात पहिला डोस घ्यावा तसेच दुसरा डोस घेण्यास चुकू नका नाहीतर पहिल्या डोस चा काही उपयोग होणार आहे. कोरोना योद्धांसाठी आम्हाला सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल महापालिकेचे आम्ही आभार मानतो असे ही त्यांनी सांगीतले