मोटारसायकलीची चोरी
पनवेल दि.२८ (वार्ताहर)- पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रिक्षा स्टॅंड परिसरात उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
स्वप्निल सहस्त्रबुद्धे यांनी त्यांची 10, 800 रूपये किंमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची मोटारसायकलपनवेल रेल्वे स्टेशन जवळील रिक्षा स्टॅंड परिसरात उभी करून ठेवली असताअज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.