वद ग्रामपंचायतीतील कोरोना योद्ध्यांचा भव्य सत्कार
पनवेल/प्रतिनिधी :- २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवद, पनवेल येथील श्री स्वामी सिद्धवासा अपारटमेंट मध्ये मागील वर्षाप्रमाणे यंदा ही श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या वेळी विशेष महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे देवद ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचार्यानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले योगदान अमूल्य असल्याने, तसेच जीवाची पर्वा न करता केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री स्वामी सिद्धवासा अपार्टमेंटचे अध्यक्ष श्री. जयंत पाखरे, सेक्रेटरी श्री. मोहन पाटील, खजिनदार श्री. हेमंत म्हात्रे व सोसायटीच्या सर्व सभासदांतर्फे ग्रामपंचायतीला सन्मान चिन्ह देण्यात आले आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ।