पोलिस पाटीलांना काम करताना काही अडी-अडचणी आल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा- सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील
पनवेल दि.29 (वार्ताहर)- पोलिस पाटीलांना काम करताना काही अडी-अडचणी आल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील ह्यांनी पोलिस पाटीलांना मार्गदर्शन करताना केले. पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील ह्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारले असता पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पाटील यांनी भारतीय संविधानाची प्रत देऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुणाल लोंढे (करंजाडे पोलीस पाटील), पांडुरंग जाधव (कोळखे पोलीस पाटील), एकनाथ पाटील (पळस्पे पोलीस पाटील), प्रमोद नाईक (डुंगी पोलीस पाटील), विजय खुटले (नांदगाव पोलीस पाटील), निलेश गायकर (तुरमाळे पोलीस पाटील) उपस्थित होते.