कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांच्या समाजकार्याचे तरूण बाल मित्र मंडळ गोडसे आळी यांनी केले कौतुक
पनवेल दि. 30 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेचेकार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने सामाजिक बांधिलकी राखत, समाजकार्य केल्याबद्दल शहरातील गोडसे आळी येथील बाल मित्र मंडळाने विशेष कौतुक केले आहे. शहरातील बाजारपेठेजवळ असलेल्या कृष्णाळे तलावाच्या शेजारी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसल्याने परिसरात घबराट पसरली होती. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेऊन पनवेल शहर पोलिस ठाणे, रूग्णवाहिका यांना कळवून सदर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पुढील शासकीय सोपसकास पूर्ण करण्यात आले व सदर मृतदे अंतिम कार्यासाठी पाठविण्यात आला. यासाठी त्यांनी ज्या तत्परतेने हालचाल करून न्याय मिळवून दिल्याबद्दल परिसरात लोकांनी व विशेषतः तरूण बाल मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.