विवाहिता बेपत्ता
पनवेल दि. 30 (वार्ताहर): तालुक्यातील डेरवली गावात राहणारी एक विवाहिता बेपत्ता झाल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
महानंदा भीमाशंकर कुंभार (वय-40) ही राहत्या घरातून कामाला जाते असे सांगून घराबाहेर पडली. ती अद्याप घरी परतली नाही. रंगाने सावळी, चेहरा गोल, अंगाने मजबूत, केस काळे, उंची 5 फूट, गळ्यात साधे गंठण, कानात झुमके असून अंगात पिवळ्या रंगाचा ब्लाऊज व हिरव्या रंगाची मोरपंखी साडी, पायात पैंजण व साधी चप्पल व सोबत मोबाईल फोन तसेच कपाळावर व हातावर शंकर म्हणून गोंदलेले आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे दुरध्वनी-27452444 किंवा पोलिस हवालदार एस.डी. पारकर यांच्याशी संपर्क साधावा. फोटोःमहानंदा भीमाशंकर कुंभार