लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संजय कदम यांना कोरोना योद्धा पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
पनवेल (वार्ताहर)- लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक २०२१ सामन्याच्या वेळी कोरोना पार्श्वभूमीवर केलेल्या कामांची दखल घेत कोरोना योद्धा पुरस्कार देऊन पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांना गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. गिरीश गुणे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक मुकीत काझी, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मा. नगरसेविका नीता माळी, मा. नगरसेवक अच्युत मनोरे, आयोजक केदार भगत, डॉ. अमितकुमार दवे, डॉ. रेहाना मुजावर, पत्रकार केवल महाडिक, पत्रकार सय्यद अकबर, सुशांत मोहिते, पप्पू भट, सुजाता गडगे, कांचन कदम, सुप्रिया सावंत, संदिप शेळके, भावेश शिंदे, संतोष ढगे, राज निंबार्गी आदी मान्यवर उपस्थित होते.