महिंद्रा झायलो गाडीची मोटार सायकलला धडक ; 1 ठार
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः महिंद्रा कंपनीच्या झायलो गाडीची समोरुन येणार्या मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील एक इसम मरण पावल्या घटना करंजाडे परिसरात घडली आहे.
विरु दास (24) हा त्याच्या ताब्यातील झायलो गाडी घेवून चालला असताना त्याने करंजाडे येथे मोटार सायकल क्र.एमएच-46-एएस-3762 ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात या गाडीवरील बाबूलाल शेख (25) रा.बॉम्बे नाका, हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.