पनवेल तालुक्यातील अजिवली येथे राहणारी तरूणी बेपत्ता
पनवेल दि.07 (वार्ताहर): तालुक्यातील अजिवली येथे राहणारी एक तरूणी राहत्या घरातून तिच्या कॉलेजची फी भरण्यासाठी कॉलेजला जाते असे सांगून ती अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु. पूजा जगदीश गुप्ता, असे या तरूणीचे नाव असून उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, रंग गोरा, नाक उभट, डोळे काळे, केस लांब असून अंगात लाल रंगाचा फूल बाह्यांचा असलेला टी-शर्ट व काळ्या रंगाची जीन्स तसेच पायात काळ्या रंगाचे सॅंडल, सोबत काळ्या रंगाची बॅग, गळ्यात सोन्याची चैन, डाव्या हाताच्या मनगटावर गोंदलेले आहे. तिच्यासोबत मोबाईल आहे. या तरूणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे दुरध्वनी-27452444 येथे संपर्क साधावा.