झाडाला कापडी गमछाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः घरामागील झाडाला कापडी गमछाच्या सहाय्याने अज्ञात कारणावरुन गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गणेशनगर भागात घडली आहे.
मुकेश चंदेश्वर राय (23) याने अज्ञात कारणावरुन तो राहत असलेल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या करंजाच्या मोठ्या झाडाला कापडी गमछाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबतची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.