पंचशील नगर सामाजिक संस्थे तर्फे संयुक्त जयंती साजरी…
पनवेल / शंकर वायदंडे :- पंचशील नगर सामाजिक संस्था नवीन पनवेल यांनी दि ०७ फेब्रुवारी रोजी माता रमाई जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याग मूर्ती रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम पंचशील नगर बुद्ध विहारात दुपारी १२.१५ ला पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर वायदंडे व खजिनदार भानुदास वाघमारे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी संस्थे च्या सह सचिव यांनी माता रमाईच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला तसेच माता जिजाऊ, माताअहिल्यादेवी, मातासावित्री, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले यांच्या फोटो ला सौ सुरेखा वायदंडे ,पल्लवीआखाडे, रुपाली खंडागळे,अक्षदा जाधव, इत्यादी नी पुष्पहार अर्पण केले.
यानंतर सायंकाळी ८ वाजता लहान मुलांचा संस्कृती कार्यक्रम झाला असून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातील या कार्यक्रमाला महिलांची उपस्थित लक्षणीय होती या वेळी संस्थेचे सचिव श्री राहुल पोपलवार यांनी या पुढे संस्था कोणते पंचशील नगर च्या विकासासाठी अडी अडचणी साठी तसेच पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करून सर्वाना न्याय हक्कासाठी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगत सर्व घर झोपडी धरकांनी या संस्थेचे सभासद घ्यावेत जेणेकरून आमच्याकडे सर्व माहिती असल्यास आम्हाला शासकीय निमशासकीय विविध योजना आपल्यापर्यंत पोचवत येईल पंचशील नगरच्या राहिवाश्यानी सभासद म्हणून नावे नोंदवावे असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर वायदंडे, उपाध्यक्ष श्री अशोक आखाडे, सचिव श्री.राहुल पोपलवार, सह सचिव विनोद खंडागळे,खजिनदार श्री भानुदास वाघमारे, सह खजिनदार कांताबाई वानखेडे, संघटक कैलास नेमाडे, सह संघटक सुरेखा वायदंडे आदी सह सदस्य सुरेश पराड, रामदास खरात संतोष जाधव,संजय धोत्रे, संतोष ढोबळे, अमेय इंगोले,हेमा रोड्रिंक्स, शोभा गवई,वल्ली महमद शेख, अजय दुबे,आदी सह अनेक नागरिक उपस्थित होते.
हा कार्यक्र पार पाडण्यासाठी गोपाळ उबाळे, अनिल वानखेडे, आमन तायडे अविनाश पराड,धीरज नाईक, करन बोरुडे, शुभम वानखडे आदींनी मेहनत घेतली.