महिलेच्या गळ्यातील दागिने खेचून पसार
पनवेल दि.09 (वार्ताहर)- पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून मोटारसायकलीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पसार झाल्याची घटना खांदा वसाहतीत घडली आहे.
खांदा वसाहतीतील से.-1 मध्ये राहणाऱ्या सुजाता शिंदे या त्यांच्या मैत्रिणीसह रस्ता ओलांडीत असताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी त्यांच्या मानेवर जोराचा फटका मारून सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.