नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तळोजा येथे रक्तदान शिबिर
पनवेल/प्रतिनिधी:करोनाचे महामारीचा मुकाबला करीत असताना आरोग्यसेवेस रक्त तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक दायित्व स्वीकारून *नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत तळोजा व खारघर वाहतूक शाखे मार्फ़त दिनांक ०९.०२.२०२१ रोजी सकाळी १०.०० ते १६.०० वाजेपर्यत टी. एम. ए. हॉल, स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी, तळोजा एमआयडीसी, तळोजा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर ठिकाणी खारघर व तळोजा एमआयडीसीतील कंपनी चे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 108 बॉटल रक्त प्राप्त केले .
सदर रक्तदान शिबिर हे मा.पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा श्री पुरुषोत्तम कराड यांचे मार्गदर्शनाखाली खारघर आणि तळोजा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री आनंद चव्हाण व श्री महेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी उत्कृष्ट उत्कृष्टपणे नियोजन करून रक्तदान शिबीर यशस्वी केले